कोल्हापूरकरांचा चीनी मालावर बहिष्कार

कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून चीन देशातील वस्तूंना देशभरात विरोध होताना पाहायला मिळत आहे. शिवाय चीनकडून सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी देखील चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्याला आता भारताच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातही चिनी वस्तूंना विरोध होत आहे. शिवाय, आमचेच पैसे आमच्याविरोधात लढाईसाठी वापरत असतील, तर आम्ही चिनी वस्तू का खरेदी करायच्या? असे म्हणत कोल्हापूरकरांनी 'बॉयकॉट मेड इन चाईना' या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
सेना जवाब देगी बुलेटसे, हम देंगे वॉलेटसे.. या घोषासह कोल्हापूरकरांनी चीनी मालावर बहिष्कार टाकला आहे.कोल्हापूरात शहरात मागील ४ ते ५ दिवसांपासून विविध संघटनांनी चीनहून येणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. त्यामुळे सामान्य नागरिक देखील आता या वस्तू विकत घेण्याऐवजी भारतीय वस्तूंना प्राधान्य देत आहेत. कमी किंमतीमध्ये जास्तीत जास्त सुविधा मिळतात म्हणून बाजारपेठेत चायनीज मोबाईलला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, आता दुकानदारच 'बॉयकॉट मेड इन चाईना प्रॉडक्ट्स' ही मोहीम सुरू करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे लहान मुलांची बहुतांश खेळणी सुद्धा चाईना वरून येत असतात.'चायनीज वस्तू जरी कमी किमतीत मिळत असतील, तरी त्यांचे आयुष्य जास्त नसते' हेच सांगत कोल्हापूरातील व्यापारी आता भारतीय वस्तू विकण्यावर जास्त भर देत आहेत. चीन येथील वस्तूंना पर्याय म्हणून दिल्ली, मुंबई बाजारपेठेतून येणाऱ्या खेळण्यांना ते पसंती देत आहेत. शिवाय एकीकडे नागरिकांचाच विरोध होत असेल, तर आम्ही दुकानात चाईना वस्तू का ठेवू? असेही ते म्हणत आहेत. सामान्य नागरिक सुद्धा आता या वस्तू विकत घेताना, चायनीज वस्तूऐवजी भारतीय वस्तूंना प्राधान्य देत आहेत. शिवाय 4 पैसे वाढवून जरी गेले, तरी आम्ही भारतीय वस्तूच घेणार, असेही काहीजण म्हणत आहेत.कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सकडून तर 'बॉयकॉट मेड इन चाईना प्रोडक्ट' ही मोहीमच हाती घेण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानदारांना याचे महत्व पटवून देण्यात येणार असून त्यांच्या दुकानांवर तसे स्टिकर सुद्धा लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget