भाडेकरूने केली माजी उपजिल्हाधिकारी आणि पत्नीची हत्या

अकोला - भाडेकरूंनी घर मालक दाम्पत्याची हत्या केल्याची घटना शहरातील बळवंत कॉलनीमध्ये शुक्रवारी घडली. सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नथ्थुराम उंद्राजी भगत व त्यांची पत्नी हेमलता नथ्थुराम भगत (७८) यांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत शुक्रवारी सकाळी आढळले होते.आरोपींनी अपघाती मृत्यू भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना जेरबंद केले.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांना संशय आल्याने गतीने तपास करण्यात आला. यामध्ये हे दुहेरी हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले. घरातील सोन्याचे दागिने व इतर ऐवज असा एकूण पाच लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हत्या करून लंपास करण्यात आला. शिवाय मृतदेह त्यांचे राहत्या घरात जाळून दोघांचाही अपघाती मृत्यू असल्याचे भासविण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. या प्रकरणी वंदना लक्ष्मणराव पाढेन (५८) यांच्या फिर्यादीवरून खदान पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३९४, ३४ अन्वये गुन्हा नोंद करून तपास केला. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या नेतृत्वातील पथकाने गुन्हय़ातील मृतकांचे भाडेकरू असलेले आरोपी मोहम्मद रफिक मोहम्मद हमजा (४२) व मेहमुदाबी परविन वसिम खान (३८) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हय़ाची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींना अटक करून चोरी गेलेला माल हस्तगत केला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget