औरंगाबादमधील बहिण-भावाची चुलत भावानेची केली हत्या

औरंगाबाद - औरंगाबादमध्ये बुधवारी दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले होते. सातारा परिसरातील कनकोरबेन नगर येथे बहिण-भावाची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. ही घटना रात्री ८:३० च्या दरम्यान समोर आली. जेव्हा घरातील इतर व्यक्ती घरी परतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धक्कादायक म्हणजे या घटनेत नातेवाईकांनीच या दोघांचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे. चुलत भावाने आपल्या भाऊजीच्या मदतीने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. घरातील दीड किलो सोन्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.
१६ वर्षाचा सौरभ खंदाडे दहावीत तर १८ वर्षाची किरण खंदाडे बीए प्रथम वर्गात शिकत होती. सकाळी या मुलांची आई आणि मोठी बहिण कारने पाचनवडगावला गेले होते. त्यामुळे किरण आणि सौरभ हे दोघेच घरी होते. रात्री जेव्हा कुटुंबातील व्यक्ती घरी परतले तेव्हा घरचा दरवाज नुसता लोटलेला होता. पण जेव्हा ते बाथरुममध्ये पोहोचले तेव्हा किरण आणि सौरभ हे मृत अवस्थेत पडले होते. तसेच घरातील दीड किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग आणि रोख रक्कम गायब होती.पोलिसांनी २४ तासांच्या आत या घटनेचा तपास केला आणि आरोपींना पकडले. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget