औद्योगिक वीज ग्राहकांना बिल भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदत

जळगाव - टाळेबंदीत सरासरीनुसार देयक देण्यात आलेल्यांना प्रत्यक्ष मीटर रिडींगनंतर वीज वापरानुसार अचुक देयक देण्यात येत आहेत. औद्योगिक ग्राहकांना टाळेबंदीच्या कालावधीतील वीज देयक भरण्यासाठी तीन महिन्याचा अवधी वाढवून देण्यात आल्याची माहिती जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिली.औद्योगिक संघटना आणि ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत वेबिनारव्दारे कुमठेकर यांनी संवाद साधला. करोनाच्या पार्श्वभूमीवर महावितरण जळगाव परिमंडळाच्या वतीने जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगिक आणि ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत ‘टाळेबंदी कालावधीत वीजपुरवठा, वीज देयके आणि तक्रारींची स्थिती’ या विषयावर वेबिनार घेण्यात आला.यावेळी मुख्य अभियंता कुमठेकर यांनी टाळेबंदीत महावितरणकडून केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.सहभागी प्रतिनिधींनी विद्युत पुरवठा आणि वीज देयकासंदर्भाने उपस्थित केलेल्या तांत्रिक अडचणी, शंकांचे निरसन करुन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत कुमठेकर यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष श्यामसुंदर अग्रवाल यांनी ‘केव्हीएएच बिलिंग’ संदर्भात उद्योजकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्याचे सुचविले.
या वेबिनारमध्ये लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष किशोर ढाके, जळगाव इंडस्ट्रिज असोसिएशनचे सचिव सचिन चोरडिया, जैन इरिगेशनचे सतीश बांगर, खान्देश इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष भरत अग्रवाल, अखिल भारतीय ग्राहक पंचायत बैठक संघटनेचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष रमेश सोनवणे, सुदर्शन पेपर मिल भुसावळचे राजीव चौधरी, नंदुरबारच्या देवका फुडसचे सुरेश अग्रवाल, शहाद्याच्या जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे देवरे, सातपुडा सहकारी साखर कारखाना, नंदुरबारचे प्रल्हाद चौधरी आदींनी वेबिनारमध्ये सहभाग घेतला.यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता फारुख शेख (जळगाव), प्रकाश पौणिकर (धुळे) आणि राजेशसिंग चव्हाण (नंदुरबार) यांच्यासह परिमंडळातील सर्व विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget