कोरोनाचा कहर ; देशात १० हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले असून, कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ५० हजारांवर गेली आहे. तर १० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १ लाख ८७ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, देशात एकूण ३ लाख ५४ हजार १६१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.हा डेटा सरकारने जाहीर केलेला नाही. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे आतापर्यंत ११ हजार ९२१ लोकांचा मृत्यू झाला आहेत तर, १ लाख ५४ हजारांहून अधिक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. कोरोनातील मृत्यूच्या आकड्यांमध्ये अचानक वाढ होते आहे.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २७०१ नवीन रुग्ण वाढले असून ८१ लोकांचा मृत्यू झाला. यासह, महाराष्ट्र सरकारने मागील काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या १३२८ मृत्यूंचा समावेश करण्यासाठी आपल्या आकडेवारीत बदल केला आहे, परंतु अहवाल मिळाला नाही. या आकडेवारीनुसार फक्त मुंबईत ८६२ लोकांचा मृत्यू झाला आहे.आता महाराष्ट्रात मृतांचा आकडा ५ हजार ५३७ वर गेला आहे. पुष्टी झालेल्या प्रकरणांची संख्या १ लाख १३ हजार ४४५ आहे, ज्यामध्ये सक्रिय प्रकरणांची संख्या ५० हजारांपेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, ५७ हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. मुंबईत कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ६० हजाराहून अधिक आहे, ज्यामध्ये ३१६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासांत दिल्लीमध्ये कोरोनाचे १८५९ नवीन रुग्ण आढळले असून ९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातील हा सर्वात मोठा मृत्यू आहे. आता एकूण रूग्णांची संख्या ४४ हजार ६८८ झाली आहे.आता दिल्लीत मृतांचा आकडा १८३७ वर गेला आहे. आतापर्यंत दिल्लीत १६ हजार ५०० लोकं बरे झाले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget