राज्याच्या मुख्य सचिवांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी

ठाणे - ठाणे शहरात करोना आटोक्यात आणण्यात स्थानिक प्रशासनाला यश येत नसल्याने राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयातील बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.आयुक्त, दोन अतिरिक्त आयुक्त, शासनाने नियुक्त केलेले दोन सनदी अधिकारी असा मोठा प्रशासकीय जामानिमा असतानाही संसर्ग रोखता येत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील पालिकांच्या प्रशासकीय प्रमुखांशी त्यांनी चर्चा केली.
करोना प्रतिबंधाबाबत ठाणे शहरात प्रशासकीय पातळीवर गोंधळाची स्थिती असून महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अजब आदेशांमुळे यामध्ये भर पडू लागली आहे. अधिकाऱ्यांची मोठी फळी तैनात असतानाही शहरात करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे प्रशासकीय गोंधळाची चर्चा सातत्याने सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्य सचिव मेहता यांनी शुक्रवारी सकाळी महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत कानउघाडणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget