बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला

बुलडाणा - जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी पुन्हा नवीन ५ कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. या पाच रुग्णांपैकी मलकापूर येथील पारपेट भागातील ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान बुलडाणा येथे कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ५ झाली आहे. 
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्याच्या अहवालांपैकी ४६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४१ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ५ अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील ३३ वर्षीय पुरुष, २२ वर्षीय तरुण आणि २२ वर्षीय महिला, खामगाव तालुक्यातील चिखली २५ वर्षीय तरुण, पारपेट भागातील ६५ वर्षीय वृद्ध (उपचारादरम्यान मृत्यू) यांचा समावेश आहे.आतापर्यंत १ हजार ७५० रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ११८ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी ५ मृत आहे. तसेच ७७ कोरोनाबधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रूग्णालयात ३६ कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget