आंतरराष्ट्रीय योग दिन ; १८ हजार फुटांवर भारतीय जवानांनी केला योगा

लडाख - भारतासह जगभरात रविवारी सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात राहूनच योग दिन साजरा केला जात आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी लडाखमध्ये अक्षरक्ष: रक्त गोठवणाऱ्या थंडीत योग करत योग दिन साजरा केला. जवानांनी तब्बल १८ हजार फुटांवर हा योग केला.
"योगा फॉर हेल्थ-योगा अ‌ॅट होम". म्हणजेच, आरोग्यासाठी योग, घरच्या घरी योग! कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळेच, याआधी साजऱ्या केल्या गेलेल्या योग दिवसांप्रमाणे एकत्र येऊन योगाभ्यास न करता, लोकांना आपापल्या घरातच योगासने करण्याचे आवाहन यावर्षी करण्यात येत आहे.२१ जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारतातील ५ हजार वर्ष जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. संयुक्त राष्ट्राने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget