‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान, विशेष आर्थिक पॅकेज देण्याची मागणी

रायगड - अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी रायगड जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला.कोकण किनारपट्टी वगळता उर्वरित भागात या चक्रीवादळाचा फारसा परिणाम जाणवला नाही. बुधवारी रात्री उशिरा चक्रीवादळाचा जोर ओसरला. त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होत आहे, असे हवामान खात्याने सांगितले.
दरम्यान, चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात तडाखा बसला. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदिती तटकरे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. तसेच झालेले नुकसान भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विशेष आर्थिक पॅकेजची मागणी अदिती तटकरे यांनी सांगितले.
रायगड जिल्ह्याच्या दक्षिण किनारपट्टीला मुरूड परिसरात दुपारी दीडच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. त्यात प्रामुख्याने अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, रोहा, उरण, माणगाव आणि पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली. विजेचा धक्का बसून अलिबागच्या उमठे येथे दशरथ बाबू वाघमारे (५८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.चक्रीवादळाच्या तडाख्याने झाडे उन्मळून पडल्याने अलिबाग-रेवस, अलिबाग- पेण, मुरूड- माणगाव, मुंबई- गोवा महामार्ग बंद झाला. सात तालुक्यांत विजेचे खांब मोठ्या प्रमाणात कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तसेच दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget