मुंबईत आणखी एका तरुणाची आत्महत्या

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे कला क्षेत्रात खळबळ उडाली असतानाच मुंबईत आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील प्रभाग १५५ चे शिवसेनेचे नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांचा मुलगा अभिषेक श्रीकांत शेट्ये (वय २५) याने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. अभिषेक याने घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी रात्री ९ वाजता ही घटना उघडकीस आली.चेंबूर येथील सुमन नगर परिसरातील इमारतीत शेट्ये कुटुंबीय राहत आहे. रविवारी तो आणि त्याचा भाऊ वेगळ्या खोलीत झोपला होता. त्यांचा भाऊ उठून बाहेरच्या हॉलमध्ये गेला.त्यानंतर त्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. कित्येक वेळ होऊन देखील तो उठला नसल्याने त्याला खोलीत बघायला गेलं असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
अभिषेकने आत्महत्या केल्यामुळे भावाला एकच हादरा बसला. त्याने याची माहिती कुटुंबीयांना दिली. अभिषेकला तत्काळ त्यांनी चेंबूरच्या खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले.अभिषेकने आत्महत्या का केली, याची कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget