४ दिवसात भारतात ४० हजारांहून अधिक सायबर हल्ले

मुंबई - लडाखच्या गलवान खोऱ्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर भारत-चीन दरम्यान चर्चेतून मार्ग काढला जात असताना आता चीनमधून भारतातील सरकारी आस्थापने, बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर व संपर्क क्षेत्रात सायबर हल्ले मागील ४ दिवसात वाढल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात आलेल्या या सायबर हल्ल्याच्या तपासामधून ही माहिती समोर आली आहे. या सायबर हल्ल्यात अनोळखी मेलच्या माध्यमातून हे हल्ले केले जात आहेत. या काळात इंटरनेटवर जर तुम्ही तुमची व्यक्तिगत माहिती कुणासोबत शेअर करत असाल तर तुम्ही अधिक सतर्क राहायला हवे, असे असल्याचे महाराष्ट्र सायबर सेलकडून नागरिकांना सूचित करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या ४ दिवसात चीनमधील चेंगदू या शहरातून तब्बल ४० हजार ३०० सायबर हल्ल्यांचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत असताना चीनमधील चेंगदू येथून सायबर हल्ले वाढले आहेत. कोरोनाच्या संदर्भात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू सारख्या इतर महत्वाच्या शहरात मोफत कोरोनाचाचणीसाठी स्वतःची माहिती भरण्यासाठी ncov2019@gov.in सारख्या बनावट लिंक वर क्लिक करून माहिती देण्यास सायबर हॅकर नागरिकांना सांगत असल्याचे तपासातून समोर आले आहे.
याबाबात महाराष्ट्र सायबर विभागाकडून इंटरनेटचा वापर करणाऱ्या नागरिकांना सतर्क करण्यात येत असून कुठल्याही परिस्थितीत तुमच्या मेलवर अनोळखी व ओळखीच्या मेल आयडीवरून आलेल्या मेल मधील अटॅचमेन्ट उघडताना सावध राहणे गरजेचे आहे. या अटॅचमेन्टमध्ये असलेल्या कुठल्याही लिंकवर स्वतःची गोपनीय माहिती देण्याचा प्रयत्न करु नये, खास करून बँकेच्या संदर्भातील माहिती देऊ नये. अशा प्रकारच्या मेलमध्ये स्पेलिंगच्या चुका ह्या मोठ्या प्रमाणात असतात. या दरम्यान नागरिकांना मोठ्या प्रमाणात सायबर ऑनलाइन लॉटरी, तुमचा मेल आयडी, मोबाईल नंबर लॉटरीसाठी निवडला गेल्याचे एसएमएस, व्हाट्स अॅप संदेश, मेल आल्यास तात्काळ अशा प्रकारच्या गोष्टी डिलीट कराव्यात.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget