पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ

नवी दिल्ली - सात दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसत आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होत आहे. तरी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७५ रूपये प्रती लिटरवर पोहोचले आहेत.देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात ५९ ते ६० पैशांनी वाढ झाली असून डिझेलच्या दरात ५० ते ६० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पेट्रोल ३.९० रूपये प्रती लिटर तर डिझेल चार रूपये प्रती लिटर झाला आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर ७५ रूपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ७३.३९ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे. मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईत पेट्रोलचे आजचे दर ८२.१० रूपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ७२.०३ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे.चेन्नई आणि कोलकातामध्ये पेट्रोलचे दर क्रमशः ७८.९९रूपये आणि ७७.०५ प्रती लिटर आहे. डिझेलचे दर क्रमशः ७१.६४ रूपये आणि ६९.२३ रूपये प्रती लिटर आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget