झारखंड सरकारचा केंद्राला धक्का ; लडाख भागातील रस्ता पूर्ण कसा करायचा ? केंद्र सरकारला पडला प्रश्न

दुमका - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झारखंड सरकारने बॉर्डर रोड आॅर्गनायझेशनला (बीआरओ) दिलेली परवानगी नाकारली आहे. लडाखमधील रस्त्याच्या कामासाठी दुमका भागात कामगारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात यावी, यासाठी झारखंडमधल्या हेमंत सोरेन सरकारने परवानगी दिली होती. मात्र आता ही परवानगी मागे घेण्यात आल्याने लडाख भागातील रस्ता पूर्ण कसा करायचा, असा प्रश्न सरकारपुढे निर्माण झाला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता महानगरांमध्ये कामासाठी गेलेले झारखंडमधले अनेक मजूर घरी परतले आहेत. त्यांच्या मदतीने लडाखमधल्या रस्त्याचे काम करण्याचा मोदी सरकारचा मानस होता. यासाठी सोरेन सरकारनं सीमावर्ती भागातील रस्ते बांधणीचं काम करणाऱ्या बीआरओ आणि केंद्रीय दलांना मंजुरीदेखील दिली होती. गेल्याच महिन्यात सोरेन सरकारने परवानगी दिल्यानंतर बीआरओने मजुरांची निवड प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली. मात्र आता सोरेन सरकारनं बीआरओचे संचालक (नियोजन) सौरभ भटनागर यांना परवानगी रद्द करत असल्याचं पत्र पाठवले आहे.
सोरेन सरकारने बीआरओच्या संचालकांना २९ मे रोजी लिहिलेल्या पत्रात कोरोना संक्रमणाची भीती आणि लॉकडाऊनचा उल्लेख आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन वाढण्याची शक्यता पाहता आम्ही तुम्हाला देत असलेली परवानगी तातडीने रद्द करत आहोत, असे झारखंड सरकारने पत्रात म्हटले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget