विराट-अनुष्का घेणार घटस्फोट?

नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच आपल्या रोमॅंटिक फोटोमुळे चर्चेत असतात. विरुष्का नावाने ही जोडी ओळखली जाते, मात्र आता विराट आणि अनुष्का यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचा चर्चा सुरू झाल्या आहेत. २०१७ मध्ये विवाह केल्यानंतर विराट-अनुष्का यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. ट्विटरवर तर #VirushkaDivorce ट्रेंड होत आहे. 
याआधी अनुष्काची बहुचर्चित वेब सीरिज 'पाताललोक' रिलीज झाल्यानंतर भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी विराट अनुष्काच्या घटस्फोटाची मागणी केली होती. भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी त्यांच्या परवानगी शिवाय त्यांचा फोटो गुन्हेगारासोबत वापरून देशद्रोहाचे काम केल्याचा आरोप अनुष्कावर केला होता. तसेच गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे असे म्हटले होते. या वादावरुन भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी विराट कोहलीने आता अनुष्काला घटस्फोट द्यावा अशी खळबळजनक मागणी केली होती. यानंतर ट्विटरवर युझरने पोस्ट करण्यास सुरुवात केली. यातून #VirushkaDivorce ट्रेंड होण्यास सुरुवात झाली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget