शरद पवारांनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई - चिनी सैनिकांसोबत सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे २० सैनिक शहीद झाले. यात भारताच्या कर्नल लष्करी अधिकाऱ्याचाही समावेश आहे. दरम्यान, चिनी सैनिकांसबोत संघर्ष करताना हुतात्मा झालेल्या जवानांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
आपले सैन्यदल धैर्याने आणि दृढनिश्चयाने भारतीय सीमांचे रक्षण करत आहे, असे म्हणत पवारांनी वीरमरण प्राप्त सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. “लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये चिनी अतिक्रमणापासून आपल्या सीमेचे रक्षण करताना भारतीय लष्करी अधिकारी व जवानांना वीरगती मिळाली. आपले सैन्यदल धैर्याने आणि दृढनिश्चयाने भारतीय सीमांचे रक्षण करत आहे. वीरमरण प्राप्त सैनिकांना मानवंदना व भावपूर्ण श्रद्धांजली! असे ट्विट पवार यांनी केले आहे.
या घटनेवरुन महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. “लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहीद जवानांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत! पंतप्रधानांच्या मौनव्रताने वर्तमान प्रश्न सुटणार नाही. तर त्यासाठी विषयाची जाण, दूरदर्शिता, मुत्सद्देगिरी, नियोजन, राजकीय इच्छाशक्ती आणि योग्य परराष्ट्र धोरणाची गरज आहे”, असे ट्विट करत महाराष्ट्र काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget