'जिओ'मध्ये अबू धाबीची कंपनी गुंतवणार ९,०९३.६० कोटी रुपये

मुंबई - लॉकडाउनदरम्यान रिलायन्स ग्रुपमध्ये अजून एक मोठी कंपनी गुंतवणूक करणार आहे. अबू धाबीची ‘मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी’जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणार असल्याची माहिती रिलायन्स इंडस्‍ट्रीज लिमिटेडने दिली आहे.अबू धाबीमधील मोठी गुंतवणूक करणारी कंपनी म्हणून ‘मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी’ ओळखली जाते. रिलायन्स इंडस्‍ट्रीज लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये ९,०९३.६० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या गुंतवणुकीद्वारे कंपनी जिओमध्ये 1.८५ टक्के हिस्सेदारी खरेदी करेल.
यासोबतच गेल्या सहा आठवड्यांमधला हा जिओचा सहावा मोठा करार ठरेल. या गुंतवणुकीसह गेल्या सहा आठवड्यांमध्ये कंपनीत जगातील विविध आघाडीच्या कंपन्यांकडून एकूण ८७,६५५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याची माहितीही रिलायन्स इंडस्‍ट्रीज लिमिटेडने दिली. यापूर्वी जिओ प्‍लॅटफॉर्म्‍समध्ये मुबादलाव्यतिरिक्त फेसबुक, सिल्‍वर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक आणि केकेआर या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget