गटारांची कामे अपूर्ण असल्याने वाड्यातील रस्त्यात पाणी तुंबणार

वाडा - वाडा शहरातील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून करोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनने तसेच रस्त्याच्या आड येत असलेल्या बांधकामांमुळे हे काम काहीसे संथ गतीने सुरू आहे. जागा मोकळी न झाल्याने प्रामुख्याने गटारांचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी आता पाहिल्याच पावसाने रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे मान्सूनमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक दिवस सुरू असलेला व्यापारी व नागरिक यांच्यामधील वादाचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत वाडा शहरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले. गटारांच्या कामाने मुहूर्त होताच मंजूर अंतरात हेराफेरी झाल्याचा आरोप करीत व्यापारी विरुद्ध पूर्व विभागातील गावांकडील नागरिक असे दोन गट एकमेकांच्या विरोधात संघर्ष करू लागले. अनेक व्यापाऱ्यांनी आपली बांधकामे स्वतःहून हटवली असली, तरी अनेक कामे आजही रस्त्याच्या आड उभी आहेत. जवळपास बाराशे मीटर अंतराच्या एका बाजूने काँक्रिटीकरण झाले असून दुसऱ्या बाजूने काम अंतिम टप्प्यात आहे. तरी गटारांची कामे अनेक ठिकाणी अद्याप अपूर्णच आहेत. पावसाळा तोंडावर आला असून मान्सूनपूर्व पाऊस नुकताच वाडा तालुक्यात पडल्यानंतर शहरातील रस्त्याला तलावाचे स्वरूप आले. यातून मार्ग काढताना वाहनचालकांच्या नाकीनऊ आले होते.
खरेतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करताना गटारांचे काम आधी पूर्ण करणे गरजेचे होते, मात्र संघर्ष उद्भवल्याने अनेक ठिकाणी गटारांची कामे अपूर्ण आहेत. अशा परिस्थिती वेळेत मान्सून कोसळला, तर शहरातील रस्ते जलमय होतील. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. म्हणूनच कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने पाणी वाहून जाण्यासाठी गटारांचे तात्पुरते नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget