गर्दी करू नका उद्धव ठाकरेंचे नागरिकांना आवाहन

मुंबई - करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन ३० जूनपर्यंत सुरु असणार आहे. दरम्यान लॉकडाउन पुन्हा जाहीर केलेला नाही असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत हा खुलासा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला कुठेही गर्दी करू नका, तसंच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि काळजी घ्या असं आवाहन केल्याची माहितीही यावेळी देण्यात आलेली आहे.
रुग्णांची वाढती संख्या आणि परिस्थिती बिघडता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर केला जाणार असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना गरज लागली तर पुन्हा लॉकडाउन करावा लागेल असे सांगितले होते. पण या वक्तव्याचा काही ठिकाणी विपर्यास करत राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर होणार असल्याची अफवा पसरवली होती.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget