कोरोनामुळे प्रसिद्ध बॉलिवूड निर्मात्याचे निधन

मुंबई - देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हॉलिवूडनंतर आता कोरोना व्हायरसची झळ बॉलिवूडला देखील बसली आहे. कोरोनामुळे बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्याचे निधन झाले आहे. त्यांचे नाव अनिल सूरी असे आहे. ते ७७ वर्षांचे होते. कोरोना व्हायरसमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती भाऊ राजीव सूरी यांनी दिली आहे. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. भावाच्या निधनाची बातमी सांगतना राजीव म्हणाले की, 'प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना सर्वात प्रथम लिलावती रुग्णालय त्यानंतर हिंदुजा रुग्णालयता घेवून जाण्यात आले. या दोन्ही रुग्णालयांनी त्यांना खाट देण्यास नकार दिला. अखेर त्यांना एडव्हांस मल्टीस्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी त्यांना व्हेंटीलेटरवर देखील ठेवण्यात आले होते.' परंतु अथक प्रयत्नांनंतर शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल सूरी 'कर्मयोगी' 'राज तिलक' अशा चित्रपटाचे दिग्दर्शक होते.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget