आता गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे - उद्धव ठाकरे

मुंबई - मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्यात थोडा संपर्क कमी झाला आहे. पण अंतर कमी झालेले नाही.आणि मी विचारधारा बदललेली नाही. आता गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे. स्वत:ची काळजी घेवून लोकांची मदत करा, किती संकटे आली तरी मी डगमगणार नाही. माझे स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचे,परंतु शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न आहे असे सांगत मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. वादळामागूनी वादळे आली तरी शिवसेनाच एक वादळ आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.आज कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही. शिवसेनाच एक वादळ आहे. अशी कितीही वादळे आली तरी हे भगवे वादळ कायम राहणार आहे. शिवसेना हेच एक वादळ आहे, आम्हाला वादळाची परवा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब म्हणायचे की, माझ्याभोवती हे शिवसैनिकांचे कवच आहे. शिवसैनिकांचे कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे. आपल्या सोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे त्यामुळे मी आज येथे मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे,असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget