नागपूर महापालिकेच्या सभेत गदारोळ ; आयुक्त तुकाराम मुंढेंचा सभात्याग

नागपूर - कोरोनामुळे तीन महिने लांबलेल्या नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी जोरदार गदारोळ झाला. ‘तुम्ही सभागृहच काय, नागपूर सोडून जा’ तसेच ‘संत तुकाराम यांच्यावरुन तुमचे नाव आहे, त्याला कलंकित करुन नका,’ असे वक्तव्य भाजप नेत्यांनी केले. भाजप नगरसेवकांच्या वक्तव्यावर महापालिका चिडलेले आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहाबाहेर पडले.
सभागृहात पॉईंट आॅफ इन्फर्मेशनच्या मुद्द्यावरुन आयुक्तच आक्रमक झाले. हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असताना भाजप आमदारांनी गोंधळाला सुरुवात केली. मुंढे बोलणे थांबवत नाहीत हे बघून भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी आवाज चढवला. जर नगरसेवक आवाज चढवणार असतील तर मी इथे बसणार नाही, असे मुंढे यांनी भर सभेत महापौरांना आणि सभेला सांगितले. यानंतर तुम्ही सभागृह काय, नागपूर सोडून जा, असे वक्तव्य भाजप नेत्यांनी केल्यानंतर मुंढे नाराज झाले. त्यातच संत तुकारामांच्या नावावरुन तुमचे नाव आहे, त्याला तरी कलंकित करु नका, असे नगरसेवक हरीश ग्वालबांशी यांनी म्हटल्यानंतर मुंढे सभागृहातून बाहेर पडले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेची सर्वसाधारण सभा झालेली नव्हती. दर महिन्याला एकदा सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित असताना महापौर संदीप जोशी यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांसोबत चर्चा करुन २० जून रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलावली होती. परंतु महापालिकेची सभा ज्या ठिकाणी होणार तो टाऊन हॉल कोरोनाचे प्रतिबंधित क्षेत्र असल्याचा मुद्दा पुढे करत तिथे सभा घेता येणार नाही अशी भूमिका आयुक्त मुंढे यांनी मांडली. त्यानंतर सर्वपक्षीय गट नेत्यांनी महापालिकेच्या मालकीच्या आणि तब्ब्ल दोन हजार आसन क्षमता असलेल्या विशालकाय भट सभागृहात सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना संदर्भातले सर्व नियम पाळून सभा घेण्याचे ठरवले होते.
तुकाराम मुंढे यांनी अशी सभा घ्यावी की नाही याबद्दल राज्य शासनाचा अभिप्राय मागितला होता. त्यावर राज्य शासनाने अशी सभा घेण्यास हरकत नाही. सर्व महापलिकानी अशी सभा केव्हा आणि कोणत्या स्थितीत घ्यावी हे त्यांच्या पातळीवर ठरवावे असे सांगत फक्त सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत सभा घेण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर मुंढे यांच्या भूमिकेला राज्य शासनाने एकाप्रकारे नाकारल्याचे सांगत भाजप नेत्यांनी त्यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget