लोकल सुरू करून काय करणार? नारायण राणेंचा सरकारवर निशाणा

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंताही वाढली आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनमधूनही काहीशी सूट दिली आहे. त्यानंतर रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. राज्यात सध्याच्या घडीला कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजारांहून अधिक झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यात सरकारवर हल्लाबोल केला आहे.
लॉकडाऊन जसा हाताळला गेला पाहिजे, तसा तो हाताळला जात नाही. लोकल सेवा सुरू करून काय करणार? असा सवाल उपस्थित करत संक्रमण आणखी वाढण्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही. सरकारने आकडे कमी करून दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते उघडे पडतील. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीवर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार नारायण राणे यांनी केला.
निसर्ग चक्रीवादळ झाले, तेव्हा मी तिथेच होतो. मी नुकसान पाहिले आहे. राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही. रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांना झालेली मदत तुटपुंजी आहे. आर्थिक स्थिती वाईट असली तरी सरकारने मदतीचा फेरविचार करावा. लोकांना जास्तीत जास्त मदत करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. सिंधुदुर्गाला २५ कोटींची मदत दिली, पण यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विविध योजनांतील २०० कोटी परत घेतले. ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे. लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका. मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. फक्त फेरफटका मारून काही होत नाही, अशी टीका राणेंनी सरकारवर केली. 
अधिवेशनात विरोधी पक्षाला सामोरे जायची ताकद सत्तारुढ पक्षामध्ये आहे असे मला वाटतंच नाही असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे. सरकारला खर्च करायचा असेल, तर पुरवण्या मागण्या मान्य करुन घ्यायला पाहिजेत. त्यासाठी एक दिवसाचे अधिवेशन बोलावायला हवे अशी मागणी यावेळी नारायण राणेंनी केली.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget