सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. वांद्रे येथील पाली हिल भागात राहत्या घरी गळफास लावून त्यानो आत्महत्या केली होती. ही घटना उघडकीस येताच पोलिसांच्या त्याचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला होता. त्याचे अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले असून ही आत्महत्याच असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
माहिती देताना प्रतिनिधीसुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत. तो काही महिन्यांपासून तणावात होता. याच तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.रविवारी रात्री उशिरा सुशांत सिंह यांची बहिण आणि भाऊजी मुंबईत पोहोचले आहेत. आज दुपारी अन्य नातेवाईक ही येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुशांत सिंह यांच्या पार्थिवावर विलेपार्ले स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. कोरोनाचा संसर्ग पाहता चाहत्यांनी गर्दी करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget