राजू शेट्टींचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा

कोल्हापूर - विधानपरिषदेच्या सदस्य निवडीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील अंतर्गत वाद अखेर शुक्रवारी रात्री उशिरा मिटला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली आणि आपला वाद मिटवला. आपण एक असल्याचे म्हणत यांचा फोटो व्हायरल झाला आहे.यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी याचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे.शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय राजू शेट्टी यांच्या बैठकीत घेतला आहे. नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक याची नाराजी दूर करून शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र आले आहेत. या बैठकीत राजू शेटटी, प्रा. डाॅ. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, डॉ. महावीर अक्कोळे, पै. विठ्ठल मोरे, भाऊ साखरपे, जनार्दन पाटील,अजित पवार, डॉ. श्रीवर्धन पाटील हे उपस्थित होते.
राजू शेट्टी यांच्या समर्थनार्थ स्वाभिमानीच्या महिला प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी रक्ताने पत्र लिहिले आहे. “तुम्ही आमदारकी स्वीकारावी ही तमाम शेतकऱ्यांची भावना आहे. पद असो किंवा नसो तुम्ही ढासळू नका,” अशी भावनिक साद पूजा मोरे यांनी राजू शेट्टींना घातली आहे. “शेतकऱ्यांसाठी रक्त सांडण्याचा तुमचा विचार जिवंत राहिला पाहिजे,” यासाठी रक्ताने पत्र लिहिल्याचा खुलासाही पूजा मोरे यांनी केला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget