माल्ल्याच्या प्रत्यार्पणावर अंतिम शिक्कामोर्तब, कोणत्याही क्षणी भारतात परतणार

मुंबई - भारतीय बँकांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळालेला विजय माल्ल्या कोणत्याही क्षणी भारतात येईल, अशी माहिती तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबईमध्ये विजय माल्ल्याविरोधात आधीच गुन्हा दाखल आहे, त्यामुळे त्याला मुंबईतच आणले जाणार आहे. तपास यंत्रणांमधल्या सूत्रांनी सांगितल्यानुसार माल्ल्याचे विमान सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर उतरू शकते. सोमवारी रात्री विमान मुंबईत उतरल्यानंतर काही वेळातच माल्ल्याला सीबीआयच्या कार्यालयात ठेवले जाईल. यानंतर त्याला कोर्टात सादर केले जाणार आहे.
इंग्लंडमधल्या कोर्टाने माल्ल्याच्या भारतातल्या प्रत्यार्पणावर शिक्कामोर्तब केले होते. नियमानुसार माल्ल्याला त्या दिवसापासून २८ दिवसांमध्ये इंग्लंडमधून भारतात आणायचे आहे, त्यामुळे २० दिवस आधीच निघून गेले आहेत. दुसरीकडे प्रत्यार्पणाची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे माल्ल्या कधीही भारतात परतू शकतो.विजय माल्ल्या मुंबईत पोहोचल्यानंतर वैद्यकीय टीम त्याच्या तब्येतीची तपासणी करेल. सीबीआय आणि ईडीचे काही अधिकारी विमानात माल्ल्यासोबत असतील. ज्यादिवशी माल्ल्या भारतात पोहोचेल, त्यादिवशी विमानतळावरून त्याला थेट कोर्टात नेले जाईल. कोर्टामध्ये सीबीआय आणि ईडी विजय माल्ल्याची रिमांड मागतील. 
ऑगस्ट २०१८ साली सुनावणीदरम्यान इंग्लंडमधल्या कोर्टाने भारतीय तपास यंत्रणांकडे जेलबाबत विस्तृत माहिती मागितली होती. यानंतर मुंबईतल्या आर्थर रोड जेलमधला व्हिडिओ इंग्लंड कोर्टाला दाखवण्यात आला होता. विजय माल्ल्याला आर्थर रोड जेलमध्ये सुरक्षित बराकमध्ये ठेवण्यात येईल, असे तपास यंत्रणांनी कोर्टाला सांगितले होते. आर्थर रोड जेलमध्ये अबू सालेम, छोटा राजन, मुस्तफा डोसा यांना ठेवण्यात आले. मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातला दोषी कसाबही याच जेलमध्ये होता. तर शीना बोरा मर्डर केसमध्ये आरोपी पीटर मुखर्जी यांनाही आर्थर रोड जेलची हवा खावी लागली होती. 

किंगफिशर एयरलाईन्सचा मालक विजय माल्ल्यावर भारतातल्या १७ बँकांचे ९ हजार कोटी रुपये थकवल्याचा आरोप आहे. २ मार्च २०१६ साली विजय माल्ल्या भारत सोडून ब्रिटनला पळाला. भारतीय तपास यंत्रणांनी इंग्लंडमधल्या कोर्टात माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मोठी कायदेशीर लढाई लढली. यानंतर १४ मे रोजी इंग्लंडच्या कोर्टात माल्ल्याच्या प्रत्यार्पणावर अंतिम शिक्कामोर्तब झाले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget