कोरोना रुग्णांसाठी एसआरएतील घरे देऊ नका अन्यथा, बृहन्मुंबई भाडेकरु परिषदेचा इशारा

मुंबई - जुन्या चाळीतील तसेच झोपडपट्टी रहिवाशांसाठी पुनर्विकासानंतर तयार होत असलेली घरे कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेण्याची योजना आखली जात आहे. आता ही योजना रद्द करण्याची मागणी बृहन्मुंबई भाडेकरु परिषदेने केली आहे. अन्यथा रहिवासी अंबानींच्या अँटिलिया टॉवरमधील रिकाम्या फ्लॅटमध्ये घुसतील, असा इशारा मुंबई महापालिकेला दिला आहे.
मुंबईसारख्या कष्टकऱ्यांच्या शहरात जुन्या चाळीत आणि झोपडपट्ट्यांमध्ये लाखो लोक अनेक पिढ्यांपासून राहात आहेत. त्यांचा पुनर्विकास अनेक वर्ष प्रलंबित आहे. हे सर्व आपली घरे रिकामी करुन १०, १५, २० वर्ष ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये घरांच्या प्रतिक्षेत आहेत. अनेक ठिकाणी विकासकाने भाडे देणेही बंद केले आहे. त्यामुळे, हे नागरिक आधीच अडचणीत आहेत. त्यांना हक्काची घरे ताबडतोब मिळाली पाहिजेत. यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणीही परिषदेने यावेळी केली.मुंबईत असंख्य टॉवर उभे राहिले आहेत. त्यातील अनेक फ्लॅट्स केवळ गुंतवणुकीसाठी घेऊन ठेवलेले आहेत. हे रिकामे फ्लॅट ताब्यात घ्या. मुंबईत अंबानी कुटुंबाची २२ मजल्यांची इमारत आहे. ती कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घ्या. महालक्ष्मीचे गोल्फ मैदान आहे. त्यांना आधीच उपनगरात जागा दिली आहे. ते ताब्यात घ्या. सर्व पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घ्या. मात्र, कष्टकऱ्यांच्या घराचा ताबा घेतला तर अंबानींच्या अँटिलियामध्ये भाडेकरु, रहिवासी घुसतील, असा इशारा परिषदेचे सरचिटणीस प्रकाश रेड्डी आणि अध्यक्ष प्रकाश नार्वेकर यांनी दिला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget