पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, अमित देशमुखांची बंद दरवाज्याआड बैठक

कराड - राज्य सरकारमध्ये काँग्रेसला महत्त्व दिले जात नाही. तसेच निर्णय प्रक्रियेवेळी विचारात घेतले जात नाही, असा नाराजीचा सूर असतानाच सोमवारी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत सतेज पाटील आणि अमित देशमुख यांची दरवाज्याआड बैठक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मंत्री सतेज पाटील कराडमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंगल्यावर दाखल झाले. त्याच दरम्यान सांगली दौऱ्यावर असलेले मंत्री अमित देशमुख हे सांगलीहून पुण्याला जाणार होते. जाताना तेही पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंगल्यावर दाखल झाले.तिघांची सुमारे एक तास बंद खोलीत चर्चा झाली. नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे समजू शकले नाही. चर्चेनंतर मंत्री अमित देशमुख अगोदर बंगल्यातून बाहेर पडून पुण्याकडे रवाना झाले. त्यानंतर सायंकाळी साडे पाचच्या सुमारास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे दोघेजण कारमधून मुंबईकडे रवाना झाले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget