कोरोनाचे संकट ; देशात ऑनलाईन मतदान पद्धतीची नेत्यांकडून मागणी

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे सर्व जगावर संकट आले आहे.अद्याप कोरोनावर रामबाण औषध सापडललेले नाही तर हे संकट दीर्घकाळ चालण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांच्या जगण्याची दिशाच बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात निवडणूक हा उत्सवच असतो. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी त्यावर ऑनलाईन मतदान हा पर्याय होऊ शकतो अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे.काँग्रेसचे नेते शशी थरुर, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील मोदी, अडिशनल सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन यांनी अशा ऑनाईन मतदानाबाबबत अनुकलता व्यक्त केली. थरुर यांनी हे मत आपले व्यक्तिगत मत असल्याचे स्पष्ट केले आहे.
अनेक विकसित देशांना मागे टाकत भारताने मतदान हे इलेक्ट्रीक व्होटिंग मिशनच्यासाह्याने घ्यायला फार पूर्वीच सुरुवात केली. मतमोजणीही त्यामुळे अतिशय कमी वेळेत होऊ लागली. त्यामुळे वेळ आणि पैशाचाही बचत झाली. मात्र त्यावर अजुनही आक्षेप घेतली जात आहेत. मात्र या मशिन्स हॅक करतात येतात हे अजुन कुणालाही सिद्ध करता आलेले नाही.
आता वर्षभरात अमेरिकेत निवडणुका आहेत. तिथे काही याबाबत काही प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की, ऑनलाईन मतदान पद्धत विकसीत करता येऊ शकते असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.भारतात वारंवार निवडणुका होत असतात. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही होत असतो. एवढे करूनही ६० टक्क्यांच्या आसपासच मतदान होत असते.
सार्वत्रिक निवडणुकांना अजुन चार वर्षांचा कालावधी असला तरी पुढच्या वर्षी पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत. त्यावेळी सगळ्यांचीच कसोटी लागणार आहे. ऑनलाईन मतदानाला सध्यातरी सर्वच राजकीय पक्ष मान्यता देण्याची शक्यता खूपच कमी आहे. कोरोनामुळे जी परिस्थिती बदलली त्यामुळे यावर आता देशात चर्चा सुरू होणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget