सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून ‘यशराज फिल्म’ची चौकशी

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकजण बॉलिवूडच्या घराणेशाहीवर टीका करत आहे, काहींनी या प्रकरणाची थेट कोर्टात तक्रार नोंदवली आहे, करण जोहर, सलमान खान, आलिया भट्टसारख्या कलाकारांना नेटीझन्सकडून ट्रोल करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनीही सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची कारणे शोधण्यासाठी तपासाचा वेग वाढवला आहे.
गुरुवारी पोलिसांनी या प्रकरणात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिचा जबाब नोंदवला तसेच सुशांतच्या घरातून ५ डायऱ्या ताब्यात घेतल्या असून त्याचा तपास करण्यात येणार आहे. त्याचसोबत पोलिसांनी यशराज फिल्मला पत्र लिहून सुशांत राजपूतसोबत केलेल्या सिनेमा कराराच्या कॉपी मागवल्या आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, यशराज फिल्मसोबत सुशांतने किती सिनेमा साईन केले होते, त्याचा तपास करण्यात येणार आहे.गुरुवारी पोलिसांनी सुशांत राजपूतची पीआर मॅनेजर राधिका निहलानी आणि माजी व्यावसायिक मॅनेजर श्रुती मोदी यांचाही जबाब नोंदवला. श्रुती मोदी ही सुशांत राजपूतसोबत जुलै २०१९ पासून काम करत होती. फेब्रुवारी महिन्यात छिछोरे या सुशांतच्या शेवटच्या सिनेमात रिलीज होईपर्यंत काम केले.
श्रुती मोदी हिने पोलिसांना सांगितले की, सुशांत नेशन इंडिया फॉर वर्ल्ड या नावाची कंपनी सामाजिक कामासाठी नोंद करणार होता. याद्वारे तो आपत्ती मदत, वृक्षारोपन मोहीम काम करणार होता.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget