“भारत आगीशी खेळत आहे” चीनचा भारताला इशारा

नवी दिल्ली - आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची संघटना असलेल्या जी सेव्हनमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करणारा भारत आगीशी खेळत असल्याचा धमकी वजा इशारा चीनने ‘ग्लोबल टाइम्स’मधील लेखामधून दिला आहे. “जी सेव्हन विस्तारामध्ये सहभागी होत भारत आगीशी खेळ आहे,” अशा मथळ्याखाली छापण्यात आलेल्या या लेखामधून चीनने भारताला या संमेलनामध्ये सहभागी करुन घेण्यामागे अमेरिकेचा वेगळाच हेतू असल्याचे म्हटले आहे. भारताचा समावेश करुन घेत हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरामधील आपली ताकद वाढवण्याचा अमेरिकेचा इरादा असून चीनची कोंडी करण्यासाठी हा डाव असल्याचे लेखात म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये २ जून रोजी रात्री फोनवरुन चर्चा झाली. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या सी सेव्हन देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी जी सेव्हन देशांच्या संघटनेचा विस्तार करायचा मानस व्यक्त केला असून त्या दृष्टीने ट्रम्प यांनी भारताला निमंत्रीत करण्याचे हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. भारतानेही या निमंत्रणावर सकारात्कम प्रतिसाद दिला आहे. याचाच संदर्भ देत भारताला इशारा दिला आहे.
“जी सेव्हनचा विस्तार करण्याचा विचार हा भूप्रदेशासंदर्भातील राजकारणावर आधारित आहे. या विस्ताराचे मूळ हेतू हा चीनला कोंडीत पकडण्याचा आहे. भारत हा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याने त्याला या परिषदेमध्ये सामावून घेतले जात नसून अमेरिका भारताला आपल्या हिंदी महासागरातील योजनांचा महत्वाचा जोडीदार समजत आहे. या क्षेत्रामध्ये चीनची वाढत्या ताकदीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिका भारताला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे ग्लोबल टाइम्समधील लेखात म्हटले आहे. ‘ग्लोबल टाईम्स’चे पत्रकार यू जिनकुई यांनी लियू झोंगी यांच्या मुलाखतीवर आधारित हा लेख लिहिला आहे. झोंगी हे शांघाय इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजमधील चीन-दक्षिण आशिया सहकार्याच्या संशोधन केंद्राचे सरचिटणीस आहेत. त्यामुळे या लेखामधून चीन भारत आणि अमेरिकेमधील वाढत्या संबंधांकडे कशाप्रकारे पाहत आहे याचा अंदाज बांधता येतो.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget