माझ्या खांद्यावरून, पवारांना बांद्रयाच्या सिनिअर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची आहे – फडणवीस

मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे म्हणाले ते मी ऐकले, मी विदर्भातील आहे त्यामुळे समुद्राची पाहणी करायला चाललो आहे असे ते म्हणाले, पण मी अनेकदा बारामतीत गेलो, तिथे मला समुद्र दिसला नाही. शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. माझे वडिल असते तर त्याच वयाचे असते. त्यामुळे मुलगा किती पुढे गेला तरी बापाला असे वाटते की त्याला कमी समजते. त्या भावनेतून शरद पवार बोलले असतील. त्याहीपेक्षा मला असे वाटते की माझ्या खांद्यावरून, शरद पवार यांना बांद्रयाच्या सिनिअर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची आहे. आणि त्यांना सांगायचे आहे की बाबांनो काहीतरी करा,अशी टीका शरद पवार यांच्यावर फडणवीस यांनी केली आहे.
कोकण दौऱ्याच्या पृष्ठभूमीवर पत्रकारांशी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे ११ आणि १२ जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील.राज्य सरकारने कोकणसाठी दिलेली मदत तोकडी असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले. ते म्हणाले की, ‘चक्रिवादळात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे झाडांचा विचार करुन आपल्याला नुकसान भरपाई द्यावी लागेल, १५ हजार रोख द्या अशी मागणी केली होती, ती सरकारने मान्य केलेली नाही. तसेच भांड्यांसाठीही अत्यंत तोकडी मदत केली आहे. अनेक गोष्टींचे नुकसान झाले आहे, कोकणासाठी किमान सात ते साडेसात कोटीचे पॅकेज द्यावे लागेल, तरच कोकण परत उभे राहिल असेही ते म्हणाले. 
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकण दौरा केला आहे. 
मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत तर चांगले आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल. असे म्हणत शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पुन्हा एकदा फडणवीस आणि पवार या दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget