सोनू सूदला वांद्रे टर्मिनल्सला जाण्यापासून पोलिसांनी रोखले

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजुरांसाठी अभिनेता सोनू सूद हा अगदी 'देवदूत' ठरलेला आहे. अभिनेता सोनू सूदने आतापर्यंत अनेक मजुरांना आपापल्या गावी, घरी सोडलं आहे. बसेसच्या माध्यमातून आतापर्यंत १२ ते १३ हजार मजुरांना सोनूने घरी जाण्याची व्यवस्था करून दिली आहे. मात्र सोमवारी सोनू सूदला पोलिसांनी वांद्रे टर्मिनल्सला जाण्यापासून रोखले आहे.सोनू सूद आतापर्यंत अनेक मजुरांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकावर जाऊन त्यांची भेट घेत होता. पण सोमवारी पहिल्यांदाच सोनू सूदला आरपीएफ जवानांनी वांद्रे टर्मिनल्सला जाण्यापासून रोखलं आहे. 
सोमवारी उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या मजुरांची सोनू सूद भेट घ्यायला गेला होता. मात्र तेथे जाण्यास पोलिसांनी रोखल्यामुळे सोनूने त्यांना बाहेरूनच निरोप दिला. रविवारी सोनू सूदने मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.सध्या सोनू सूद यांच्या मदतीवरून राजकारण सुरू झाले आहे. भाजप-शिवसेना सोनू सूदच्या मुद्यावरून आमनेसामने आली आहे. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget