मानखूर्द-घाटकोपर लिंक रोडवरील भंगार गोदामाला भीषण आग

मुंबई - मुंबईच्या पूर्व उपनगरातील मानखुर्द मंडाळा येथील एका भंगाराच्या दुकानाला आग लागली. आगीच्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
मंगळवार दि. २३ जून सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मानखुर्द मंडाळा ट्रान्झिस्ट कॅम्प, लोरोईलाही मस्जीद जवळ, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथे एका भंगाराच्या गोदामाला आग लागली. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे ३ फायर वाहन, ५ जम्बो वॉटर टँकर, ३ वॉटर टँकर व २ रेस्क्यू वाहने उपस्थित होती. आग सुमारे १५ हजार चौरस फुटाच्या गोडाऊनला लागली आहे. या गोडाऊनमध्ये भंगाराचे सामान व ऑइलचे पिंप असल्याने आग भडकली त्यामुळे अग्निशमन दलाला आग विझविण्यात शर्तीचे प्रयत्न करावे लागले. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत होते.स्थानिकांनी कित्येक वेळा या अनधिकृत कंपन्यांविरोधात तक्रारी केल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. सदर दुर्घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget