मुख्यमंत्र्यांचे हस्ते आदासा कोळसा खाणीचे उदघाटन

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जवळील आदासा कोळसा खाणीचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. या कोळसा खाणीमुळे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत आहे. त्यामुळे उद्योगाला यामुळे चालना मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात पहिलाच नवीन प्रकल्प सुरु होत आहे.वेस्टर्न कोल फिल्डच्या नागपूर जवळील आदासा या कोळशाच्या खाणीचा ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी हे सुध्दा ऑनलाइन शुभारंभात सहभागी झाले. दरम्यान, आदासा येथील खाणीत ३३५ कोटी रुपये गुंतवणूक होत आहे. १.५ दशलक्ष टन कोळसा उत्पादन होईल. याच वर्षी ही खाण सुरु होणार आहे. एकूण तीन खाणींचा शुभारंभ करण्यात आला आहे. उर्वरित दोन मध्यप्रदेशमधील आहेत. या शुभरंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी हे देखील ऑनलाईन सहभागी झाले. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget