चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी सैन्याला शस्त्रास्त्रांचा वापर करण्याची मुभा

नवी दिल्ली - भारत- चीनदरम्यान सुरु असणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय सैन्याला सीमा भागात दिल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्र वापराच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. चीनसोबत लागून असणाऱ्या एलएसी म्हणजेच लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलपाशी अतिशय अटीतटीच्या प्रसंगी गरज भासल्यास गोळीबार आणि शस्त्रास्त्रांचा वापर करण्याची मुभा भारतीय लष्कराला देण्यात आली आहे. रविवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गरज भासल्यास चीनला जशास तसे उत्तर देण्याची मुभा सैन्याला दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच सीमाभागात तणावाच्या परिस्थितीनं गंभीर वळण गेल्यास सैन्याला परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पूर्ण सूट देण्यात आल्याचे सांगितले होते.
दरम्यान, यापूर्वी १९९६ आणि २००५ या वर्षांमध्ये करण्यात आलेल्या करारांनुसार कोणत्याही देशाला कोणावरही बेछूट गोळीबार करण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. शिवाय एलएसीपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर कोणत्याही प्रकारच्या स्फोटकांचा वापर न करण्याची अटही दोन्ही राष्ट्रांनी म्हणजे भारत आणि चीनने मान्य केली होती. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget