ब्रिटनमध्ये चाकूहल्ल्या, ३ ठार

ब्रिटन - बर्कशायरमधील रीडिंग शहरातील एका उद्यानात लिबियन वंशाच्या एका इसमाने केलेल्या चाकूहल्ल्यात तीन जण ठार झाले असून हा दहशतवादी हल्ला असल्याचे ब्रिटनच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.थेम्स पोलिसांनी याप्रकरणी हत्येची प्राथमिक चौकशी सुरू केली असून शहरातील अत्यंत गजबजलेल्या उद्यानातील हत्येमागील उद्देश काय असावा, याचा तपास केला जात आहे. दहशतवाद प्रतिबंधक विभागाचे अधिकारी डीन हेडन यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले आहे.
हत्या केल्याच्या संशयावरून एका २५ वर्षीय युवकाला शनिवारी रात्री अटक करण्यात आली असून तो अद्यापही पोलीस कोठडीतच आहे. बर्कशायरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या फॉर्बरी उद्यानात हा चाकूहल्ला करण्यात आला. अटक करण्यात आलेला युवक ब्रिटनमध्ये राहणारा लिबियन वंशाचा असल्याचे कळते.
दरम्यान, अमेरिकेतील मिनियापोलिस येथे झालेल्या गोळीबारात एक जण ठार तर अकरा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला १० जणांना गोळ्या मारण्यात आल्या त्यात ते जखमी झाले. नंतर एकूण १२ लोकांना गोळ्या लागल्याचे सांगण्यात आले. मृताचे नाव समजू शकले नाही.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget