आयआयटी-हैदराबादने विकसित केले स्वस्त टेस्ट किट

हैदराबाद - करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी चाचण्या हा एकमेव उपाय असतानाच, आयआयटी हैदराबादने केवळ २० मिनिटांत 'कोव्हिड-१९'च्या चाचणीचा अहवाल देणारे अत्यंत स्वस्त टेस्ट किट विकसित केले आहे. केवळ ५५० रुपयांत हे किट तयार करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यास केवळ ३५० रुपये खर्च येणार आहे.'कोव्हिड-१९'साठी आयआयटीने विकसित केलेली ही पर्यायी चाचणी 'रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन- पॉलिमरेज चेन रिअॅक्शन' (आरटी-पीसीआर) या पद्धतीवर आधारित नाही. देशात सध्या वापरल्या जाणाऱ्या चाचण्या या आरटी-पीसीआर पद्धतीवर आधारित आहेत. आयआयटी-हैदराबादमधील संशोधकांनी या टेस्ट किटच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. या किटच्या चाचण्या हेदराबादमधील एसिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पटलमध्ये करण्यात आल्या आहेत. संशोधकांच्या या पथकाने 'इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रीसर्च'कडे (आयसीएमआर) मंजुरीसाठी अर्ज केला आहे. 'स्वस्त किमतीचे हे चाचणी किट एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेण्यास सुलभ आहेत. कोव्हिड-१९च्या जिनोमच्या संरक्षित भागातील विशिष्ट रचनेचवर आधारित पद्धतीचा या चाचणीसाठी वापर केला जातो,' असे आयआयटी हैदराबादच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक शिव गोविंद सिंह यांनी सांगितले. याआधी आयआयटी-दिल्लीमधील संशोधकांनी पीसीआर आधारित चाचण्यांसाठी किट विकसित केले होते. या संस्थेला या चाचणीसाठी आयसीएमआरची मंजुरीही मिळाली होती.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget