खासगी प्रयोगशाळेवर करोना चाचण्या करण्यास बंदी ; मुंबई महापालिकेचा आदेश

मुंबई - मुंबईतील सर्वात मोठया खासगी प्रयोगशाळेवर पुढच्या चार आठवडयांसाठी करोना व्हायरसच्या चाचण्या करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील करोना चाचण्यांचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला मुंबई देशातील करोना व्हायरसचे हॉटस्पॉट बनले आहे. प्रयोगशाळेकडून करोना चाचणीचे रिपोर्ट उशिराने मिळत असल्याने मुंबई महापालिकेने ही बंदीची कारवाई केली आहे.रिपोर्ट मिळायला विलंब होत असल्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे कठिण होते. त्यामुळे उपचाराला विलंब होतो. काही प्रसंगी रुग्णाचा मृत्यू सुद्धा होतो असे महापालिकेने आपल्या आदेशात म्हटले आहे.या खासगी प्रयोगशाळेने रिपोर्ट द्यायला विलंब होत असल्याचे मान्य केले आहे. पण त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा करोनाची लागण झाली, हे सुद्धा त्यामागे एक कारण असल्याचे सांगितले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget