पाकिस्तानात दाऊद इब्राहिमचा करोनामुळे मृत्यू ?

मुंबई - गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्याने शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त होते. मात्र आता करोनामुळे दाऊदचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तिथेच त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. पाकिस्तानकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.गँगस्टर दाऊद इब्राहिम करोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सुरु आहे. न्यूज एक्सने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, करोनामुळे दाऊदचा कराचीत मृत्यू झाला आहे. 
दरम्यान, शुक्रवारी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याचं वृत्त होते. पण दाऊदचा भाऊ अनीस याने मात्र दाऊद आणि त्याच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. अनिस इब्राहिम दाऊद किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला करोनाची लागण झाली नसल्याचे सांगितले आहे.
IANS ने दिलेल्या वृत्तानुसार, अनिस इब्राहिमने सांगितले आहे की, “दाऊदच्या कुटुंबातील सर्वजण सुरक्षित असून कोणालाही करोनाची लागण झालेली नाही. सर्वजण घरात सुरक्षित आहेत”. यावेळी अनिसने संयुक्त अरब अमिराती आणि पाकिस्तानधून आपले काम सुरु असल्याची कबुली दिली आहे. याआधी दाऊदच्या कर्मचाऱ्यांनी क्वारंटाइन करण्यात आल्याचे वृत्त होते.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget