'या' भागात होऊ शकतात शाळा सुरू, मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई - राज्यात अनेक अटी शिथिल करण्यात आल्या असल्याने बाजारपेठा पुन्हा फुलू लागल्या आहेत. परंतु, राज्यात शाळा या ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याचा सरकाराचा प्रयत्न आहे. तसेच राज्यात ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही आणि तिथे इंटरनेट नाही अशा भागात शाळा सुरू करता येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.केंद्र सरकारने लॉकडाउन ५ ची घोषणा करत शाळा उघडण्याचा निर्णय राज्य सरकारांवर सोडला आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकारने शाळा उघडण्यास नकार दिला आहे. 
मे महिन्याच्या सुट्टीत अनेक शाळांचा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापर करण्यात आला. त्यामुळे अनेक राज्यांनी शाळा उघडण्यास नकार दिला आहे.महाराष्ट्रातही शाळा उघडण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. परंतु, 'ज्या परिसरात इंटरनेट व्यवस्था आणि कोरोनाचे संक्रमण नाही, जे जिल्हे ग्रीन झोन आहे तिथे शाळा उघडल्या जाऊ शकतात. परंतू, इतर ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल. जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू केले पाहिजे' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
याआधीही मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती. 'मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही. शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये. कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला कोणताही अडथळा येत नाही, हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते.
दरम्यान, केंद्र सरकारने दिलेल्या सुचनेनुसार, एका वर्गात जर ४० विद्यार्थी असतील तर एकावेळी वर्गात केवळ २० विद्यार्थी बसू शकतील. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकेल. पण असे केल्याने शिक्षक आणि जागेची कमतरता भासू शकते त्यामुळे दोन सत्रात शाळा- महाविद्यालयं सुरू कऱण्यात यावीत. सकाळच्या सत्रात २० तर दुपारच्या सत्रात २० विद्यार्थी किंवा जागेच्या उपलब्धतेनुसार विद्यार्थी संख्या ठरवावी.
अनेक विद्यापीठ आणि शाळांमध्ये ५ दिवसांचा आठवडा आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी ५ ऐवजी ६ दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget