'पतंजली आयुर्वेदीक'ला आयुष मंत्रालयाची नोटीस

नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसचा कहर चालू आहेत मात्र अद्याप जगामध्ये कोणीही त्यावर औषध तयार केले नसून,यावर मात्र गुणकारी औषध शोधल्याचा दावा करणाऱ्या योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडकडून करण्यात आला. या औषधाचे मंगळवारी अनावरणही करण्यात आले. ज्यानंतर केंद्राकडून पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडला नोटीस बजावण्यात आली असून, या औषधाचा तपशील आणि त्याच्या वैद्यकिय चाचणीचे, निकालाचे अहवाल सादर करण्याची विचारणा करण्यात आली आहे. आयुष मंत्रालयाने उत्तराखंड, हरिद्वारस्थित पतंजली आयुर्वेदीक लिमिटेडच्या नावे एक पत्रक जारी केले. बातम्यांमध्ये या औषधाबाबतची माहिती मिळताच मंत्रालयाने ही पावले उचलली आहेत. ज्यामध्ये मंत्रालयाने औषधाची सर्व माहिती, त्याचा अभ्यास, वैद्यकिय तपशील अशी सर्व माहिती मागवली आहे.सोबतच या औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेशही मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. शिवाय या औषधाच्या निर्मितीसाठी उत्तराखंड सरकारने दिलेल्या राज्यस्तरीय परवान्याची प्रतही मागवण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. 
दरम्यान, या औषधाच्या चाचणी प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांनी अद्यापही औषधाचे कोणतेही निष्कर्ष प्रसिद्ध केलेले नाहीत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास १०० कोरोनाबाधित रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली होती. ज्यांपैकी ५० जणांना औषधाची मात्रा देण्यात आली होती. तर, ५ जणांनी मध्येच माघार घेतली होती. उर्वरित रुग्णांचंही चाचणीसाठी योगदान होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget