कोकणात निसर्ग चक्रीवादळाचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई - दोन दिवसीय कोकण दौऱ्यानंतर माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे या भेटीत पवारांनी कोकणातील चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे. या बैठकीत नुकसान भरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच विद्युत आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणातील या भागात फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी या भेटीत सांगितले. यासाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची तयारीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे. फळबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जुनी रोजगार हमी योजना लागू करण्याची गरज असल्याचा मुद्दाही शरद पवार यांनी बैठकीत मांडला. कचऱ्याचे ढिगारे साफ करुन घरे, बागा आणि दुकाने स्वच्छ करावी लागतील. यासाठी रोजगार हमी योजनेचा वापर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
अन्नधान्य पुरवठा विभागाकडून पीडितांना सध्या ५ किलो तांदूळ, गहू आणि १ लिटर केरोसिन विनामूल्य मदत देण्यात येते. या भागातील विद्युत व्यवस्था पूर्ववत होण्यास महिन्याचा अवधी लागेल. त्यामुळे प्रत्येक पीडित कुटुंबाला किमान ५ लिटर केरोसिन दरमहा देण्याची गरज.
पर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, हर्णे, दापोली, अलिबाग, मुरुड-जंजिरा वगैरे भागात कोरोनापाठोपाठ चक्रीवादळामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज.बँका बंद असल्याने नागरिकांच्या हाती पैसे नाहीत. शेती व इतर व्यवसायांचे जुन्या कर्जांचे हफ्ते भरण्यासाठी आणि नवीन कर्ज देण्यासाठी बँका सुरु होणे गरजेचे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget