ठाणे पालिकेकडून गर्भवतीला चुकीचे 'कोरोना' रिपोर्ट

ठाणे - ठाण्यातील ३४ वर्षीय गर्भवतीला महापालिकेने चुकीचा ‘कोरोना’चा रिपोर्ट दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाल्याने या महिलेला रुग्णालयात दाखल होण्यासाठी वणवण करावी लागली. अखेर मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या महिलेला कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सहाय्य केले.ठाणे महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या खाजगी लॅबने ‘कोरोना’चा अहवाल चुकीचा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र आता पालिका स्तरावरही चुकीचा कोरोना रिपोर्ट दिल्याचे वायरल व्हिडिओतून समोर आले आहे.
गर्भवतीला ठाणे आणि मुंबईतील अनेक शासकीय रुग्णालयात अ‍ॅडमिट करुन न घेतल्यामुळे तिला कळा सोसाव्या लागल्या. अखेर एका सामाजिक कार्यकर्त्यापर्यंत ही बाब गेल्यानंतर या महिलेच्या चुकीच्या रिपोर्टविषयी विचारपूस करतानाचा व्हिडिओ वायरल झाला.३४ वर्षीय गर्भवती महिलेला कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज पाठवण्यात आला आणि तिला सिव्हिल रुग्णालयात जाण्यास सांगितले. सिव्हिल रुग्णालयाने त्यांना नायर रुग्णालयात पाठवले, तर नायर रुग्णालयाने शहानिशा केली, तेव्हा त्यांच्याजवळील पेपरवर संबंधित महिलेचे नाव नसल्याचे दिसले. त्यामुळे रिपोर्ट चुकीचा असल्याचे सांगून नायर हॉस्पिटलने तिला अ‍ॅडमिट न करता परत ठाण्यात पाठवले.महिलेसोबत तिचे नातेवाईक नसल्याने सामाजिक कार्यकर्ते मंगेश जोशी यांनी महिलेला ठाण्यात आणले. ही बाब मनसेच्या लक्षात येताच मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तिला पुन्हा दाखल करुन घेतले.
ठाण्यातील नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला कोरोनाचा चुकीचा रिपोर्ट दिला. त्यामुळे ती दिवसभर धावपळ करत हॉस्पिटल शोधत फिरत होती. पालिका प्रशासनाने चुकीचा कोरोना अहवाल दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे या गरोदर महिलेचे हाल झाले, तसेच चुकीचा रिपोर्ट दिल्याने संबंधित पालिका प्रशासनावर कारवाई करुन त्यांना बडतर्फ करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. आता पालिका याबाबत काय पाऊल उचलते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget