३० जूनपर्यंत दिल्लीतील जामा मशिद बंद

नवी दिल्ली - ३० जूनपर्यंत दिल्लीतील जामा मशिद बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत सध्या करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ३० जूनपर्यंत मशिद बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जामा मशिदीचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारी यांनी ३० जूनपर्यंत मशिद बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली. लोकांशी व इस्लामिक विद्वानांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे बुखारी यांनी सांगितले. शाही इमाम यांचे सचिवांचा मंगळवारी रात्री सफदरजंग येथील रुग्णालयात करोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मनुष्याचे जिवन संकटात आहे अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा लोकांच्या जिवनाचे रक्षण करणे आवश्यक असते. मनुष्याचे रक्षण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि शरीयतमध्येही याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे, असे बुखारी म्हणाले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget