मुंबईसह उपनगरात पुन्हा लोकल सुरू करण्याची तयारी

मुंबई - कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून लोकल सेवा स्थगित करण्यात आली आहे.अनलॉक १ मध्ये अत्यवश्यक सेवा आणि सरकारी कार्यालयांमध्ये जाण्यासाठी प्रवाशांसाठी रेल्वेकडून काही विशेष लोकल सुरू करण्यात आल्या. त्याचा अभ्यास करून पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी उपनगरातील भागांमध्ये लोकल सेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू केला आहे.
अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना प्रवास करण्यासाठी विशेष पास देण्यात आला आहे. या पासच्या आधारे ते प्रवास करत आहेत. या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून पुन्हा लोकल सेवा सुरू करण्याबाबत विचार केला जात आहे. रोज मुंबई, ठाणे आणि उपगरांसाठी ७.५ मिलियन लोक लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे लोकलमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेऊन ही सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी स्थगित करण्यात आली. 
देशभरात सुरू करण्यात आलेल्या श्रमिक ट्रेनचा पॅटर्न लोकल ट्रेनसाठी वापरण्याचा विचार पश्चिम आणि मध्ये रेल्वेचा सुरू आहे. अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सर्वांना विशेष पास सोबत घेऊनच प्रवास करता येणार आहे.जे अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी कर्मचारी लोकलमधून प्रवास करणार आहेत त्यांच्या नावांची यादी रेल्वेकडे देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना विशेष पास देण्यात येतील. हा पास दाखवूनच या कर्मचारी अथवा कोरोना योद्धांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे. उपनगरातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याशिवाय बसच्या प्रवासात खूप वेळ जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रवाशांच्या संख्येनुसार लोकलची संख्या ठरवण्यात येणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget