चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताकडून लडाखमध्ये 'आकाश' क्षेपणास्त्र तैनात

लडाख - भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि नौदलाकडून पूर्व लडाखमध्ये सीमाभागात आकाश क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आले आहेत. याआधी सीमाभागात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. त्यानंतर आता क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आले आहेत. भारताकडून चिनी विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे 
चिनी विमानांच्या प्रत्यक्ष सीमारेषा भागात घिरट्या सुरु आहेत. त्याच विमानांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता भारताकडून ‘आकाश’ क्षेपणास्त्रे सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. तसेच सुखोईसारखे लढाऊ विमानेदेखील तैनात करण्यात आले आहेत.सध्या भारत-चीन युद्ध होणार नसले तरी युद्धसदृश्य परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनची कमांडिंग स्थरावर बैठक झाली होती. चीनने आपण सैन्य माघारी घेऊ, असे मान्य केले होते. मात्र, चीनने तसे केले नाही. याउलट सीमाभागात चिनी सैन्याचे क्षेपणास्त्रांचे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे चीनने त्याभागात मोठ्या प्रमाणात बांधकाम करायला सुरुवात केली आहे, असे शैलेंद्र देवळेकर यांनी सांगितले.चीनकडून नवे दावे केले जात आहेत. अशा परिस्थितीत आपण लष्करीदृष्टीने सज्ज राहावे. कारण चीन कोणत्या क्षणी धोका देईल, हे सांगता येत नाही. चीन सीमेवर आपल्या लष्करी सेनेचं प्रदर्शन करत असल्याने आपल्याला जशास तसे उत्तर देणे गरजेचं आहे. त्यामुळे भारताकडून सीमाभागात क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले. सध्या युद्ध होणार नाही. मात्र, लष्करी क्षमतेचे प्रदर्शन दोन्ही देशांकडून केले जात आहे.







Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget