पंतप्रधान मोदींच्या हस्ते रोजगार योजनेचा प्रारंभ

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुसऱ्या राज्यातून आलेल्या प्रवासी मजूरांना त्याच्या घराजवळच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ५०,००० कोटी रुपये खर्च करुन गरीब कल्याण रोजगार योजनेची सुरुवात केली आहे. बिहारमधील खगडिया जिल्ह्यातील बेलदौर भागातील तेलिहार गावातून याची सुरुवात करण्यात आली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. कोरोना व्हायरसच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक प्रवासी मजूरांच्या हातून काम गेले आहे. त्यांच्या हाताला काम नसल्याचे मोठी आर्थिक बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांना आपल्या मूळ गावी जावे लागले.
स्थलांतरित कामगार आणि गावातील लोकांना सक्षम बनवणे, स्थानिक पातळीवर विकासाला गती मिळवून देणे आणि उपजिवेकेच्या संधी उपलब्ध करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. या योजनेचा प्रारंभ करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या २० जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. बिहार रेजिमेंटने गलवान खोऱ्यात दाखवलेल्या शौर्याबद्दल बिहार रेजिमेंटच्या वीरतेचा अभिमान असल्याचे, मोदी म्हणाले.पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेची सुरुवात केली. ही योजना बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड आणि ओडिशा या ६ राज्यातील ११६ जिल्ह्यात लागू होणार आहे. या योजनेमुळे प्रवासी मजूरांना त्यांच्या घराजवळच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
या योजनेसाठी ५०,००० कोटी रुपये खर्च येणार आहे. या योजनेद्वारे ग्राम पंचायत भवन आणि आंगणवाडी केंद्र, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे आणि जल संरक्षण यांसारखी विविध प्रकारची २५ कार्य राबवली जाणार आहेत. याद्वारे देशातील ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे मोदींनी सांगितले.मजुरांना त्यांच्या घराजवळच काम मिळावे हा आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत शहरं विकसित करत होतो, आता आपल्या गावांना मदत करायची आहे. या योजनेमुळे कामगारांच्या सन्मानाचे संरक्षण केले जाईल आणि गावांच्या विकासाला गती दिली जाईल हे उद्धिष्ट असेल असे मोदी म्हणाले.ही योजना ग्रामीण विकास, पंचायती राज, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, खाणी, पेयजल आणि स्वच्छता, पर्यावरण, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, नवीन व नूतनीकरणक्षम ऊर्जा, सीमा रस्ते, दूरसंचार आणि कृषी, अशा १२ विविध मंत्रालयांचा आणि विभागांचा समन्वित प्रयत्न असणार आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget