तपासाच्या नावाखाली फोनटॅपिंग; गहलोत सरकारवर भाजपचा आरोप

जयपूर - राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कथित घोडेबाजाराच्या तपासाच्या नावाखाली विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करत आहे, असा आरोप राज्यातील विरोधी पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड यांनी केला आहे.एसीबी तसेच एसओजी यांच्या तपासाचे आदेश देऊन गहलोत सरकार विरोधी पक्षाच्या सदस्यांचे फोन टॅप करत आहे. सरकारला चिंता करण्याचे काही कारण नाही. त्यांच्याकडे पुरावा असेल, तर त्यांनी तो जाहीर करावा, असे राजेंद्र राठोड म्हणाले. राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यापासूनच त्यांच्यात अंतर्गत वाद असल्याची टीका राठोड यांनी केली.राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावण्यासाठी घोडेबाजार सुरू असून मोठी रक्कम जयपूरकडे हस्तांतरित करण्यात आल्याची तक्रार स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपकडे (एसओजी) करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री गहलोत यांनी शुक्रवारी दिली होती. राजस्थानातून निवडावयाच्या राज्यसभेतील तीन जागांसाठी १९ जून रोजी निवडणुका होत आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget