पंतप्रधान मोदी रोजगारनिर्मितीसाठी देणार ५० हजार कोटी

नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे अनेक राज्यातून मजूर आपापल्या राज्यात परतले. अशाच मजूरांसाठी मोदी सरकार नव्या योजनाची घोषणा करणार आहेत. स्थलांतरीत मजूरांसाठी केंद्र सरकारने ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज तयार केले आहे. याअंतर्गत रोजगारनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा सहा राज्यातील ११६ जिल्ह्यांना होणार आहे. या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, शनिवारी २० जून रोजी बिहारमधील खगडिया गावातून होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेचे नाव ‘गरीब कल्याण योजना’ असे असून शुक्रवारी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेचा शुभारंभ करणार आहेत.बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, झारखंड अशा सहा राज्यांतील ११६ जिल्ह्य़ांमधील ही योजना सुरू होणार आहे. ११६ जिल्ह्य़ांमध्ये प्रत्येकी किमान २५ हजार मजूर गावी परतल्याचे केंद्राला आढळळ्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या योजनाचा लाभ २९ लाख मजुरांना होणार असून पुढील ४ महिने (१२५ दिवस) रोजगाराची हमी देणारी योजना राबवली जाणार आहे.गरीब कल्याण रोजगार योजने अंतर्गत राजस्थानमधील २२, मध्यप्रदेशातील २४ उत्तरप्रदेशातील ३१ बिहारमधील ३२ तर ओडिशातील ४ आणि झारखंडमधील तीन जिल्ह्यात गरीब कल्याण रोजगार योजना राबविण्यात येणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget