१५ जूनपासून बिहारमधील क्वारंटाईन केंद्रे बंद होणार,सरकारचा निर्णय

पटना - परराज्यातून बिहारमध्ये परतलेल्या मजूर, विद्यार्थ्यांना आता क्वारंटाईन करण्यात येणार नाही. तसेच, राज्यातील सर्व ब्लॉक स्तरीय क्वारंटाईन केंद्रेसुद्धा १५ जूनपासून बंद करण्यात येणार आहेत.बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने निर्णय घेतला आहे की, यापुढे राज्यात जे लोक येतील. त्यांची क्वारंटाईनसाठी नोंद केली जाणार नाही. बिहारमध्ये ५ हजार क्वारंटाईन सेंटर्समध्ये सोमवारपर्यंत परराज्यातून आलेल्या जवळपास १३ लाख लोकांची नोंद करण्यात आली आहे.आम्ही ३० लाखहून अधिक प्रवाशांना परत आणले आहे. आता नोंदणी बंद करत आहेत, असे बिहार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख सचिव प्रत्यय अमृत यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले की, डोअर-टू-डोअर आरोग्य तपासणी सुरूच राहील आणि वैद्यकीय सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे लेव्हल १ आणि २ हॉस्पिटलपर्यंत समान राहील.
दरम्यान, बिहारमध्ये परतलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सोमवारपर्यंत राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले ३९४५ रुग्ण आहेत. यामधील जवळपास २७४३ रुग्ण हे परराज्यातून आले आहेत. आपत्ती विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजण ३ मे नंतर बिहारला परतले आहेत.कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले बहुतेक रुग्ण हे महाराष्ट्रातून परतलेले आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या ६७७ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय दिल्ली (६२८), गुजरात (४०५) आणि हरियाणामधून परत आलेल्या २३७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. याबरोबर, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा तसेच इतर राज्यामधून परत आलेल्या लोकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget